कोल्हापूर / विठ्ठल बिरंजे
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी समाजातील शेवटच्या घटकापासून प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. परंतु या प्रयत्नांना प्रशासनातील काही व्यवस्था हरताळ फासत आहेत. असाच अनुभव कोल्हापूर-सांगली रस्त्यावरून प्रवास करणार्या नागरिकांना येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हातकणंगले तालुक्यातील पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची व्यवस्था सांगली कोल्हापुर रोड येथील संजय घोडावत विद्यापीठ येथे करण्यात आलेले आहे. परंतु, येथे दाखल झालेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना देण्यात येणारे साहित्य त्यांच्या जेवणासाठी दिलेल्या फायबर प्लेट आधी साहित्य दुसऱ्याची नष्ट करावे लागते. परंतु, येथील एजन्सीने साहित्य उघड उघड रस्त्याच्या कडेला खड्डा मारून टाकले आहे. यावर कोणती दक्षता घेतली नाही. भटकी कुत्री आणि जनावरांनी हे साहित्य अक्षरशः रस्त्यावर विस्कटून टाकलेला आहे. याचा त्रास या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसह परिसरात वस्तीवर असलेल्या शेतकऱ्यांना होत आहे.
एका बाजूला संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना हा हलगर्जीपणा होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. या गंभीर प्रश्नावर प्रशासनही सुस्त आहे. दोन तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. याची गंभीर दखल कोण घेणार आणि समूह संसर्गापासून कसे संरक्षण होणार ? असा प्रश्न उपस्थित झालेला आहे
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








