प्रतिनिधी/मुंबई
राज्य पोलीस दलातील आणखी ५५ पोलिस कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोविड १९ ची चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या पोलिस कर्मचा-यांचा आकडा १३३८ वर गेला आहे. नव्या रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले.
राज्य पोलीस दलातील दोन आयपीएस अधिकार्यांसह १३१ अधिकारी आणि १ हजार १४२ अंमलदार अशा एकूण १ हजार २७३ पोलिस कर्मचार्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. काल गेल्या चोव्वीस तासांत ६७ पोलिसांच्या कोरोना तपासणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यात आज पुन्हा एकदा ५० हून अधिक पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे असून आता एकून आकडा १३२८ पर्यंत पोहचला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे ११ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान कोरोनाचा राज्यात चांगलाच संसर्ग झाला आहे. आतापर्यंत ३५ हजार ५८ जणांना कोरोना झाला आहे. तर त्यापैकी ८ हजार ४३७ जणांनी यशस्वीरित्या कोरोनाला हरवलं आहे.








