28-29 ऑगस्ट रोजी होणार- परीक्षा प्राधिकरणाचा आदेश
प्रतिनिधी/ बेंगळूर
विविध व्यावसायिक कोर्सच्या प्रवेशासाठी 7 जुलैपासून होणारी सीईटी परीक्षा कोरोना परिस्थितीमुळे लांबणीवर टाकण्यात आली आहे. कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने यासंबंधीचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. 2021 या वर्षातील बारावी परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्याने आणि राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढल्यामुळे 7 जुलैपासून ते 8 जुलैपर्यंत होणारी सामान्य प्रवेश परीक्षा (सीईटी) आणि 9 जुलै रोजी होणारी कन्नड भाषा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. सदर सीईटी 28 ऑगस्ट आणि 29 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. तर कन्नड भाषा परीक्षा 30 ऑगस्ट रोजी होणार आहे. लवकरच सीईटीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतील, असे परीक्षा प्राधिकरणाने सांगितले आहे.









