वार्ताहर / गोकुळ शिरगाव
जीवाची पर्वा न करता कोरोना संसर्गजन्य आजाराच्या फैलावातही प्रशासनाला मदत करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान होणे आवश्यक आहे.शासनाने प्रत्येक पत्रकारांना विमा कवच दिले पाहिजे.असे मत अरुणीमा माने यांनी व्यक्त केले.कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत पोलीस, आरोग्य व प्रशासनास सहकार्य करणाऱ्या पत्रकारांना उजळाई वाडी ता. करवीर येथील एस फोर ए ग्रुप च्या वतींने मास्क, सॅनिटांझर व जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप करण्यात आले.
प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी कोरोना विषाणूजन्य परिस्थितीत स्वतः व कुटूंबाची काळजी घेईन व प्रशासनाला सहकार्य करण्याची शपथ घेण्यात आली. यावेळी करवीर पंचायत समितीच्या माजी सदस्या अरुणीमा माने,सामाजिक कार्यकर्ते एस राजू माने,नायकू बागणे,शिवाजी माने,शशिकांत माने, विकास यादव,यांच्यासह उजळाईवाडी,गोकुळ शिरगाव परिसरातील पत्रकार उपस्थित होते.