ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील रुग्णांनी 4.16 लाखांचा टप्पा पार केला आहे. राज्यातील दैनंदिन आकडे आणि मृत्यूंची वाढती संख्या धडकी भरवणारे ठरत आहेत. मागील 24 तासात तब्बल 8 हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. काल 8,874 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 154 जणांनी आपला जीव गमावला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 4 लाख 16 हजार 350 इतका झाला आहे. तर कालच्या दिवशी 5,126 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत 3 लाख 39 हजार 803 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 9 हजार 979 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वाढती मृत्यू संख्या ही भीतीदायक आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 75 लाख 74 हजार 249 टेस्ट करण्यात आल्या आहेत. यातील 63, 576 टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या. सद्य स्थितीत 66 हजार 568 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 8,728 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 238 जण व्हेंटिलेटरवर आहेत.









