- 72 हजार 277 ॲक्टिव्ह रुग्ण
ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच एक दिलासादायक बाब समोर आली आहे. मागील 24 तासात 7,143 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर कालच्या दिवशी 8,174 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 लाख 11 हजार 652 पोहोचली असून त्यातील 4 लाख 27 हजार 058 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कालच्या दिवशी 231 जणांनी आपला जीव गमावला आहे, तर आतापर्यंत 12 हजार 317 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वाढती मृत्यू संख्या ही भीतीदायक आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, पंजाबमध्ये आतापर्यंत जवळपास 83 लाख 37 हजार 236 नमुने घेण्यात आले आहेत. यातील 63,416 नमुने काल एका दिवसात घेतले गेले. सद्य स्थितीत 72 हजार 277 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील 8,202 रुग्णांना अक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. तर 422 जण व्हेंटिलेटरवर आहेत.









