बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्यांविरोधात एफआयआर दाखल केल्याचे सुनिश्चित करा असे कर्नाटक हायकोर्टाने वरिष्ठ पोलिसांना निर्देश दिले आहेत.
दरम्यान राज्यात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवावेत याची काळजी घ्यावी, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवारी महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षक (प्रवीण सूद) यांना निर्देश दिले. तसेच कर्नाटक महामारी रोग (केईडी) अधिनियम, २०२० नुसार नियमांचे उल्लंघन संज्ञेय आणि अजामीनपात्र गुन्हा आहे, असेही हायकोर्टाने स्पष्ट केले.
मुख्य न्यायाधीश अभय श्रीनिवास ओक आणि न्यायमूर्ती सूरज गोविंदराज यांच्या खंडपीठाने कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत पोलिसांना प्रशिक्षण देण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह एक पथक स्थापन करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. अशा पथकाद्वारे एफआयआर नोंदवणे आणि मास्क न घालणे, सामाजिक अंतर न राखणे, तसेच मोठ्या संख्येने एकत्रित येणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासह कारवाई करतील.