बेंगळूर : कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून न देताच संसर्गाच्या नियंत्रणासाठी सरकारने कोणतीही बैठक घेतली तरी त्याच्या काय उपयोग?, असा परखड प्रश्न माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी उपस्थित केला आहे. कोरोना नियंत्रणात राज्य सरकार अपयशी ठरले असून आता वेळ निघून गेली आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी कोरोना नियंत्रणासंबंधी राज्यात कठोर नियम जारी करण्याबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. यासंदर्भात कुमारस्वामी यांनी सरकारच्या भूमिकेबद्दल ट्विटरवरून टीका केली. संसर्ग रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आणि रुग्णांवर उपचारासाठी पायाभूत सुविधा पुरविलेल्या नाहीत. केंद्र आणि राज्य सरकारला कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत मिळाले होते. त्यांनी ही बाब गंभीरपणे विचारात घेतली असती तर आज ही वेळ आली नसती. कोरोना रुग्णांना उपचार मिळण्याची हमी नाही. केंद्र सरकारने रेमडेसिवीरची मनाला वाटेल तशा पद्धतीने निर्यात केली आहे. त्यामुळे देशात या लसीचा तुटवडा भासत आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. तर दुसरीकडे देशातील इस्पितळांना रेमडेसिवीरसाठी प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे, असे ट्विटही त्यांनी केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









