आमदार चंद्रकांत जाधव यांचे नागरिकांना आवाहन
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाची दुसरी लाट येणार हे स्पष्ट आहे, असे संकेत राज्याचे औषध प्रशासनाने दिले आहेत. राज्यातील काही जिल्हयात कोरोनाचे रूग्ण वाढत असून, प्रशासन कडक निर्बंध घातलेत. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांनी अधिक दक्षता घेण्याची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्क व इतर आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी केले आहे.
कोरोनाविरोधातील लढ्यात सर्वांनी एकत्रित लढण्याची गरज असल्याचे सांगून आमदार जाधव यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत. दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवरही अधिकची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवरून नियोजन आहे. सर्व गोष्टींचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन तयार आहे. दवाखाने सज्जता, वैद्यकीय सुविधा आणि औषधांचा साठा मुबलक आहे.
तसेच या लाटेची तीव्रता किती आहे ? कोरोनाच्या लक्षणांमध्ये काही बदल झाला आहे का ? या सर्व बाबींवर आरोग्य विभागाचे बारीक लक्ष आहे. तरी नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे. लॉकडाऊन टाळायचा असेल तर नागरिकांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, अनावश्यक गर्दी टाळण्यासोबतच प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे.









