ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत मागील 24 तासात 4266 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 21 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 09 हजार 748 वर पोहचली आहे. यामधील 26,907 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे एका दिवसात 2754 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 1 लाख 78 हजार 154 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 4687 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे दिल्ली वासियांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 20 लाख 22 हजार 700 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 8305 आरटीपीसीआर टेस्ट आणि 52,275 रैपिड एंटिजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत.
सद्य स्थितीत कोरोना संसर्गाचे प्रमाण 10.37 % आहे. तर 1329 झोन आणि 240 कंट्रोल रूम आहेत.









