ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. दिल्लीत देखील गंभीर परिस्थिती आहे. मात्र, दिल्लीत पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार का ? असा प्रश्न दिल्लीकरांना सतावत असतानाच आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी शनिवारी दिल्लीत लॉकडाऊनची शक्यता नाकारली आहे.
ते म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी हा उपाय नाही.
राजधानी दिल्लीत झपाट्याने रुग्ण संख्या वाढत आहे. याबाबत बोलताना जैन म्हणाले, याआधी लॉकडाऊन लावले होते कारण या विषाणूबाबत अधिक माहिती नव्हती.
पुढे ते म्हणाले, एखाद्या व्यक्तीस संसर्ग होण्यास आणि त्यापासून बरे होण्यास 14 दिवसांचा कालावधी लागतो. तज्ज्ञांनी सांगितले की, 21 दिवसांचा लॉकडाऊन केला तर विषाणू संपुष्टात येईल.

पुढे ते म्हणाले, सरकार लॉकडाऊनचा कळवधी वाढवणे सुरू ठेवले मात्र, हा विषाणू काही संपला नाही. त्यामुळे मला नाही वाटत लॉकडाऊन हा उपाय आहे. त्यामुळे सध्या तरी राज्यात लॉकडाऊनची शक्यता नाही आहे. मात्र, या विषाणूला रोखण्यासाठी आम्ही लसीकरण आणि हॉस्पिटलमध्ये बेडची संख्या वाढवत आहोत आणि सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.









