ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत मागील 24 तासात 134 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 37 हजार 315 वर पोहचली आहे. यामधील 1,078 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 75 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 25 हजार 343 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,894 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 17 लाख 24 हजार 787 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 39,852 आरटीपीसीआर टेस्ट आणि 20,034 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत.