ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 58 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 25 हजार 925 वर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 11 आणि काश्मीर मधील 47 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 735 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 44 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 1,23,263 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 50,978 रुग्ण जम्मूतील तर 72,258 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 1954 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 725 जण तर काश्मीरमधील 1229 जणांनी आपला जीव गमावला आहे.









