ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये मागील 24 तासात 257 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 04 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 18 हजार 263 वर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 144 आणि काश्मीर मधील 113जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 3 हजार 854 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
- रविवारी 475 जणांना डिस्चार्ज
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 475 रुग्णांना डिस्चार्ज दिला. तर आतापर्यंत 1,12,568 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 46,080 रुग्ण जम्मूतील तर 66,488 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 1841 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 675 जण तर काश्मीरमधील 1166 जणांनी आपला जीव गमावला आहे.









