ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 546 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 36 हजार 377 वर पोहोचली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 214 आणि काश्मीर मधील 332 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 7 हजार 672 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 1817 आणि काश्मीरमधील 5855 जण आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 28 हजार 020 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 6305 रुग्ण जम्मूतील तर 21,715 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 685 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 60 जण तर काश्मीरमधील 625 जणांनी आपला जीव गमावला आहे.
आतापर्यंत 4 लाख 57 हजार 336 नमुने नोंद करण्यात आले होते. सध्या राज्यात 44 हजार 917 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 7 हजार 672 लोक हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षात आहेत.









