ऑनलाईन टीम / जम्मू :
देशात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. त्यातच जम्मू काश्मीरमध्ये गेल्या चोवीस तासात 449 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 15 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 28 हजार 470 वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 100 आणि काश्मीर मधील 349 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 6 हजार 985 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 1594 आणि काश्मीरमधील 5391 जण आहेत.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 20 हजार 943 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 4742 रुग्ण जम्मूतील तर 16201 जण काश्मीरमधील आहेत.
तर आतापर्यंत 542 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 41 जण तर काश्मीरमधील 501 जणांनी आपला जीव गमावला आहे.
आतापर्यंत 4 लाख 13 हजार 305 नमुने नोंद करण्यात आले होते. सध्या राज्यात 41 हजार 723 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 6 हजार 985 लोक हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षात आहेत.