प्रतिनिधी / बार्शी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन आटोकाट प्रयत्न करत आहे. त्यात आज बार्शीतही संचार बंदीचे तंतोतंत पालण व्हावे आणि बार्शीच्या नागरिकांनी याबाबत पुरेपूर काळजी घ्यावी, या करिता जनजागृती करण्यासाठी शहरातून रूट मार्च काढला. या संकटाच्या काळात बार्शी पोलीसही सर्व क्षमतेने तयार आहे हा संदेश देण्यासाठी व नागरिकांत तसा विश्वास प्रस्थापित व्हावा यासाठी आज बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला.
शहराच्या सोमावर पेठ, भगवंत चौक, मंगळवार पेठ, तुळशीराम रोड, भोसले चौक, या मार्गाने हा मार्च काढण्यात आला. त्याची समाप्ती बार्शी शहर पोलीस ठाणे या ठिकाणी करण्यात आली. या आजच्या मार्च मध्ये बार्शी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या नेतृत्वाखाली सात अधिकारी , १०० बार्शी पोलीस कर्मचारी व १० होमगार्ड सहभागी झाले होते. या मार्च मध्ये बार्शी पोलिसांचा वाहन ताफाही सहभागी झाला होता. यावेळी या मार्च मधून बार्शीच्या नागरिकांच्या सेवेसाठी आणि सुरक्षेसाठी तयार असल्याचा विश्वास दिला तर यावेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदीचे तंतोतत पालण केले जावे, असेही आवाहन केले जात आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








