ऑनलाईन टीम / बिजींग :
कोरोना या जीवघेण्या विषाणूने चीनमध्ये आतापर्यंत 722 लोकांचा बळी घेतला आहे. तर या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 31 हजारांवर पोहोचली आहे. चीनच्या आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली आहे.
चीनमधील 31 प्रांतात कोरोना विषाणूग्रस्तांची संख्या 31,161 झाली आहे. रुग्णालयांची अपुरी संख्या असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या आजारावर लस शोधण्याचे काम जगभरात युद्ध पातळीवर सुरू आहे. ऑस्ट्रेलियातील एका अनिवासी भारतीयाने कोरोना लस शोधण्याच्या आपण अगदी जवळ आल्याचा दावाही केला आहे.
मात्र, दिवसेंदिवस या विषाणूचा संसर्ग वाढत आहे. इतर देशातही या विषाणूचे रुग्ण आढळत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वटवाघळांतून मानवापर्यंत खवल्या मांजरामुळे झाला असावा, असा चिनी संशोधकांचा अंदाज आहे. तसा निष्कर्षही शास्त्रज्ञांनी काढला आहे.
चीनमधून विमानाने भारतात आणलेल्या 640 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी कोणालाही या विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचे समोर आले आहे.









