ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना या जीवघेण्या विषाणूची भारतीयांना लागण होऊ नये, यासाठी चीनमधील 250 भारतीयांना परत आणण्यात येणार आहे. चीनमधील भारतीयांना परत आणण्याची परवानगी मिळावी, असे पत्र भारताने चीन सरकारला पाठविले आहे.
कोरोना या विषाणूचे 13 देशांमध्ये रुग्ण आढळून आले आहेत. या जिवघेण्या विषाणूमुळे चीनमध्ये असलेल्या 250 भारतीयांना परत आणण्याची परवानगी चीन सरकारकडे मागितली आहे. ती परवानगी मिळाल्यानंतर एअर इंडियाचे 423 आसनांचे विमान वुहानलो रवाना होणार होणार आहे.
चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्याने चीनमध्ये 106 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4,500 जणांना त्याचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे चीनमधून आलेल्या अथवा इतर देशातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे भारतात स्कॅनिंग केले जात आहे.
मुंबई आणि पुणे येथेही कोरोनाचे सहा संशयित रुग्ण असून, त्यांनाही रुग्णालयात देखरेखीखाली ठेवले आहे. चीनमधून आलेल्या नांदेडमधील एका व्यक्तीला देखरेखीखाली रुग्णालयात ठेवले आहे. केरळमध्ये 436 संशयित असून, त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे.









