वृत्तसंस्था/ टय़ुरिन
इटालियन फुटबॉल क्षेत्रामधील अव्वल युवेंटस फुटबॉल क्लबच्या सर्व फुटबॉलपटूंची सरावापूर्वी कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्याचा अहवाल आला असून त्यात सर्व फुटबॉलपटू निगेटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.
इटलीमध्ये कोरोना महामारीच्या संकटाने आतापर्यंत हजारो लोकांचे बळी गेले असून लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. इटलीमध्ये फुटबॉल पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. क्लबस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी आता प्रत्येक क्लबने सराव शिबीर सुरू करण्याचे ठरविले आहे. सिरी ए फुटबॉल स्पर्धा पुन्हा लवकरच सुरू केली जाणार असून ती 20 ऑगस्टपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. 1 सप्टेंबरपासून इटलीतील 2020-21 फुटबॉल हंगामाला प्रारंभ होणार आहे.