महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती
सोलापुर /प्रतिनिधी
काही हॉस्पिटलने कोरोनामुळे रुग्णांचे मृत्यू होऊनही त्यांची नोंद वेबसाईटवर केली नाही. तसेच कम्युनिकेशन गॅपमुळे ४० मृत्यूची नोंद झाली नाही, असे म्हणत महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी कोरोना काळात आणखी 40 जणांचा मृत्यू झाल्याची कबुली पत्रकार परिषदेत दिली. त्यामूळे आणखी ४० जणांचा मृत झाल्याची माहिती उजेडात आली.
कोरोनामुळे आणखी ४० मृतांचा आकडा पुढे आल्याने सोलापूर शहरातील कोरणा बाधित मृतांची संख्या १७३ वरुन २१३ वर पोहोचली आहे. या प्रकारामुळे संबंधीत अधिकारी डॉ. जयंती आडके यांना नोटीस देणार असल्याचे आयुक्त शिवशंकर यांनी सांगितले.
सोलापुर शहारात सोमवारी रात्री साडेदहा वाजेपर्यंत २७ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले तर ३ जणांचा मृत्यू झाला. तसेच उपचार घेऊन बरे झाल्याने आज १७ जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी दिली.
सोलापुर शहरात सोमवारी १०९ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील २७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर ८२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. २७ पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये २० पुरुषांचा तर ७ स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १९५७ झाली आहे. तसेच उपचारादरम्यान ३ जणांचा मृत्यू झाला.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : १०५८५
सोलापूर शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : १९५७
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : २१३
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : ६८५
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : १०५९
-प्राप्त तपासणी अहवाल : १०५८५
-प्रलंबित तपासणी अहवाल : ००
-निगेटिव्ह अहवाल : ८६२८