प्रतिनिधी / बेळगाव

कोरोनामुळे किंवा कोरोना काळात ज्या अनेक समस्या रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना भेडसावल्या त्यामध्ये रक्त उपलब्ध करणे ही एक महत्त्वाची समस्या ठरली. कोरोनाबाधितांना रक्ताची गरज भासली. परंतु अनेक कारणास्तव रक्त उपलब्ध करणे कठीण झाले होते. तथापि, अशा प्रतिकुल परिस्थितीतसुद्धा बेळगावमधील ब्लड बँका म्हणजेच रक्तपेढींनी उत्तम काम करून लक्षणीय स्वरुपात रक्त संकलन केले आहे.
बेळगावमध्ये महावीर ब्लड बँक, बेळगाव ब्लड बँक, केएलई ब्लड बँक, सिव्हिल हॉस्पिटल आणि साई ब्लड बँक अशा ब्लड बँका आहेत. रक्तदान हे महादान आहे. अर्थात ते स्वेच्छेने करावे लागते.
रक्ताची गरज केव्हा भासते असा विचार करता अपघातात झालेला अतिरिक्त रक्तस्त्राव, रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, प्रसूतीदरम्यान किंवा पश्चात झालेला रक्तस्त्राव, शस्त्रक्रिया व इतर गंभीर आजारांमध्ये रुग्णाला रक्ताची गरज भासते. ते मिळाले नाही तर रुग्ण दगावण्याची शक्मयता असते.
मनुष्याच्या शरीरात साधारण साडेचार ते पाच लीटर रक्त असते. रक्तदानाच्या वेळी फक्त 300 मि.ली. रक्त काढले जाते. रक्तदान केल्यानंतर 36 तासांमध्ये शरीरात रक्ताची पातळी पूर्ववत होते व दोन-तीन आठवडय़ात रक्तपेशीसुद्धा पूर्ववत होतात.
वयाच्या 18 ते 65 वर्षांपर्यंत कोणालाही रक्तदान करता येते. मात्र, रक्तदान करणारी व्यक्ती पूर्णतः निरोगी असणे आवश्यक आहे. व्यक्तीचे वजन 45 किलो वर असावे. निरोगी व्यक्तीला दर तीन महिन्यांनी रक्तदान करता येऊ शकते. मात्र, तत्पूर्वी कोणतेही प्रतिजैविक औषध घेतलेले नसावे. गत तीन महिन्यांपर्यंत मलेरिया झाला असल्यास, काविळ झाली असेल, कुत्रा चावल्याने रेबिजचे इंजेक्शन घेतले असेल, सहा महिन्यांपूर्वी मोठी शस्त्रक्रिया झाली असेल, गर्भवती, एक वर्षाखालील मुलाची माता, किंवा गर्भपात झालेली स्त्राr यांना रक्तदान करता येत नाही. उच्च किंवा कमी रक्तदाब असणाऱयांना रक्तदान करता येऊ शकते. परंतु तत्पूर्वी त्यांची चाचणी करणे आवश्यक आहे, अशी माहिती केएलई ब्लड बँकेचे डॉ. श्रीकांत वीरगी यांनी दिली.
बेळगावमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी कोरोना काळात जाऊन रक्तदान केले आहे. लोकमान्य परिवारातर्फे 27 फेब्रुवारी या मराठी भाषागौरव दिनादिवशी आवर्जुन रक्तदान शिबिर आयोजित केले जाते. यंदा या शिबिरात 100 हून अधिक जणांनी रक्तदान केले. शनैश्वर मंदिर समितीतर्फे दरवषी रक्तदान शिबिर घेतले जाते. या शिवाय रोटरी, लायन्स, विविध युवक मंडळे, गुजरात नवरात्रोत्सव मंडळ, मारवाडी युवा मंच, रेडक्रॉस, महिला मंडळे यांच्यासह दरवषी बेळगावमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात.
बेळगाव ब्लड बँक
बेळगाव ब्लड बँकेमध्ये गेल्यावर्षीच्या जूनपासून यंदाच्या जूनपर्यंत 5 हजार बाटल्या रक्त संकलन झाले आहे. जानेवारी ते एप्रिलदरम्यान 1 हजार युनिट रक्त संकलन झाले आहे. संस्थेने बेळगावसह सौंदत्ती, निपाणी या ठिकाणी रक्तदान शिबिरे घेतली आहेत, अशी माहिती बँकेचे प्रमुख गिरीश बुडरकट्टी यांनी दिली.
केएलई ब्लड बँक
केएलई ब्लड बँकेमध्ये जून 2020 ते आजपर्यंत 12 हजार युनिट रक्त संकलन करण्यात आले. एकूण 50 रक्तदान शिबिरे घेण्यात आली. 243 जणांनी प्लेटलेट्ससाठी रक्तदान केले. सात जणांनी प्लाझ्मा थेरपीसाठी रक्तदान केले. बेळगाव परिसरात रक्त आणि रक्ताशी संबंधित घटक म्हणजेच प्लाझ्मा, प्लेटलेट्स आदी असे एकूण 22 हजार युनिट रक्त देण्यात आले. मात्र कोविडमुळे रक्तदान करण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या व रक्तदानाचे प्रमाण साधारण 35 ते 40 टक्के घटले.
महावीर ब्लड बँक
महावीर ब्लड बँक येथे जानेवारी ते मे 2021 दरम्यान एकूण 465 युनिट रक्त संकलन झाले. मे 2020-21 या दरम्यान एकूण 1105 युनिट रक्त संकलन झाले.
बिम्स हॉस्पिटल ब्लड बँक
कोरोना काळातसुद्धा बिम्स हॉस्पिटलची रक्तपेढी कार्यरत राहिली. शिवाय या पेढीने बऱयापैकी रक्त संकलनही केले. फेसबुक प्रेंड्स सर्कलचे कार्यकर्ते संदेश मिळताच रक्तदान करत आहेत. गेल्या 9 वर्षांत त्यांनी केलेल्या रक्तदानामुळे 1658 युनिट रक्त संकलन केले आहे. कोरोना काळात त्यांनी 154 युनिट रक्तदान केले. या संस्थेच्या अंतर्गत आजपर्यंत 7 हजारांहून अधिक जणांनी रक्तदान केले आहे. शिवाय संस्थेने घेतलेल्या रक्तदान शिबिरात यावषी 110 युनिट रक्त संकलन झाले आहे.
रक्तदान केल्याने अनेक रोगांची सहज तपासणी होऊ शकते. वजन, तापमान, रक्तदाब याची माहिती मिळते. रक्तगट आणि हिमोग्लोबीनचे प्रमाण कळू शकते. नवीन रक्तपेशींमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. रक्तदानामुळे शरीरात आयर्नचे प्रमाण गरजेपेक्षा अधिक वाढत नाही. त्यामुळे हृदय आणि यकृत निरोगी राहते.
रक्तदान केलेल्या व्यक्तीला प्रमाणपत्र आणि कार्ड मिळते. त्यामुळे त्या व्यक्तीला जेव्हा रक्ताची गरज भासते तेव्हा रक्तपेढीतर्फे एक युनिट रक्त मोफत दिले जाते. अशी गरज भासू नये हे महत्त्वाचे आहे. परंतु एखाद्याचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान केल्याने मिळणारे समाधान हे अधिक महत्त्वाचे असते.
शेकडो रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी धडपड…

बेळगावमध्ये अनेक रक्तदाते आहेत. त्यापैकी कित्येकांनी रक्तदानाचे शतक पूर्ण करून त्यापुढेही रक्तदान सुरू केले आहे. यापैकीच एक विनायक मारुती धाकलुचे आहेत. त्यांनी गेल्या 40 वर्षांत 180 वेळा रक्तदान केले आहे. आपल्या सहकाऱयांसह त्यांनी अनेक रक्तदान शिबिरांचे आयोजन करून शेकडो रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी धडपड केली आहे. या त्यांच्या कार्याबद्दल केएलई हॉस्पिटल, केएलई आयुर्वेद हॉस्पिटल, बिम्स, रेडक्रॉस, विविध ब्लड बँका यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. स्वामी विवेकानंद प्रति÷ानचे ते संस्थापक असून आजपर्यंत त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. वंदेमातरम् संघाचे ते संस्थापक असून जय अमर शिवाजी युवक मंडळाची त्यांनी स्थापना केली आहे. अनगोळ शिवजयंती उत्सव मंडळाची स्थापना करून त्यांनी तीन वेळा अध्यक्षपद भूषविले आहे. त्यांच्या पत्नी तेजस्विनी यांनी 20 हून अधिक वेळा तर मुलगा निखिल याने तीन वेळा रक्तदान केले आहे. रक्तदानामुळे गरजूचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे हे दान करण्यासाठी समाजाने पुढे यावे, असे आवाहन ते करतात.
आतापर्यंत 112 वेळा रक्तदान

स्वच्छता निरीक्षक म्हणून काम बजावणारे संजय पाटील यांनी आजपर्यंत 112 वेळा रक्तदान केले आहे दर वषी ते नियमितपणे रक्तदान करतात ते सामाजिक कार्यकर्ते असून आजपर्यंत अनेक निराधार वृद्धांना आश्रय मिळवून दिला आहे ज्या ठिकाणी त्यांचे कार्य चालते तो परिसर स्वच्छ रहावा यासाठी ते प्रयत्नशील असतात.
| ब्लड बँकेचे नाव | संकलित झालेले रक्त युनिटमध्ये |
| केएलई ब्लड बँक | 12000 (जून 2020 ते जून 2021) |
| महावीर ब्लड बँक | 1105 (मे 2020 ते मे 2021) |
| बेळगाव ब्लड बँक | 5000 (जून 2020 ते जून 2021) |
| फेसबुक प्रेंड्स सर्कल | 9 वर्षात 1658 युनिट |
| साई ब्लड बँक | (संपर्क होऊ शकला नाही) |
| बिम्स | 2878 (जून 2020 ते 2021) |









