प्रतिनिधी / वाई
कोरोनाचे संकट जगावर कोसळले आहे. याच संकटात जे सापडले आहेत. त्यांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक संघटना पुढे येऊ लागल्या आहेत. वाई शहर व तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये याकरिता वाई मुस्लिम समाज वाई यांच्यावतीने 16 मशीनद्वारे मोफत सुविधा सुरू केली आहे. एवढेच नाही तर कोरोना सेंटर चालवण्याचा मानस ही त्यांनी प्रशासनाकडे व्यक्त केला आहे.
वाई शहरात व तालुक्यातील वाढत असलेला कोरोना रोखण्यासाठी आणि बाधित रुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी वाई येथील मुस्लिम समाज पुढे आला आहे. समाजच्यावतीने 16 ऑक्सिजन मशीन घेतल्या आहेत. 15 सप्टेंबर पासून या मशीन लोकांच्या सेवेत आहेत. याचा कुठेही गाजावाजा नाही. केवळ मशीन उपलब्ध करून थांबले नाहीत तर त्यांच्याकडून जे जे बाधित रुग्ण अडचणीत असतील त्यांच्यासाठी मदत मिळवून दिली जात आहे.
कोणाला बेड मिळवून दिला जातो आहे. वाई शहरात मुस्लिम समाजाच्यावतीने कोरोना सेंटर सुरू करण्याचा मनोदय वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांना भेटून व्यक्त केला होता. तशी तयारी ही समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. ऑक्सिजन मशीन हवी असल्यास जुम्मा मस्जिद शेजारी साईनूर अपरमेण्ट रविवार पेठ वाई 8623884050 येथे संपर्क साधावा असे आवाहन युसुफ बागवान, अमजद इनामदार, मोअजम इनामदार, ऍड.समीर इनामदार, मन्सूर पटेल, निसार तांबोळी यांनी केले आहे.
Previous Articleसंजय राऊतांच्या भेटीबद्दल फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Next Article पाकिस्तानलाही घालायचीय ‘टिकटॉक’वर बंदी









