ऑनलाईन क्लासचा होतोय परिणाम : 4 पटीने वाढले रुग्ण : शारीरिक अन् मानसिक विकास थांबल्याचे निदर्शनास
5 ते 6 तासांचा ऑनलाईन क्लास, सातत्याने मोबाईल किंवा संगणकावर काम आणि डोळय़ांना विश्रांती न देण्याचा दुष्परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. डोळय़ांमधील टियर फिल्स कोरडा पडू लागला आहे. डोळे हलविण्यात येत असल्याने घर्षण वाढू लागले असून डोळय़ांमध्ये जखमा होऊ लागल्या आहेत. टाळेबंदीनंतर मोबाईल आणि आता शालेय वर्गही संगणकावर होत असल्याने पूर्वीच्या तुलनेत 3 ते 4 पट अधिक असे रुग्ण वाढले आहेत. अद्याप पालक याचे गांभीर्य समजून घेत नाहीत, परंतु यामुळे शारीरिक आणि मानसिक विकासही थांबला आहे.
कार्नियावरील टियर फिल्स कोरडय़ा पडत चालल्या आहेत. डोळे हलविण्यात येत असल्याने घर्षण वाढत असल्याने जखम आणि इंफेक्शन होण्याचा धोका आहे. मुलांच्या चष्म्याचा नंबर लवकर वाढत आहे. मुलांच्या डोळय़ांमध्ये ताण जाणवतो आणि डोकेदुखीचा त्रास सुरू होतो. अनेक कुटुंबीय या मुलांवर मायग्रेनचा उपचार करू लागतात. मोबाईल किंवा संगणकावर सातत्याने काम केल्याने स्क्रीनला जवळून पाहिले जाते याकरता डोळय़ांच्या आतमध्ये फिरणारी मांसपेशी सातत्याने काम करतात आणि त्यांना फटका बसू लागतो. काही दिवसांनी मुले जवळील लिखाणही वाचू शकत नाहीत.
काय योग्य ठरणार?
दर 20 मिनिटांनी डोळय़ांना आराम दिला जावा. 10 सेकंदांपर्यंत दूरपर्यंत पाहण्यात यावे. सातत्याने काम करत राहावे लागत असल्याने लुब्रिकेंट ड्रॉप किंवा आर्टिफिशियल टीयर ड्रॉप टाकावा. डोकेदुखी असल्यास चष्म्याचा नंबर अवश्य तपासून व्हावा. जुने संगणक युबी रेडिएशन देतात, यातून कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. मुलांना संगणकावर अधिक वेळ काम करू देऊ नये.









