खोची / वार्ताहर
कोरोना काळात सामाजिक बांधिलकीचे भान जपून पुरोगामी शिक्षक संघटनेने संपूर्ण जिल्ह्यातील कोविड रूग्णांसाठी डिस्पेन्सर च्या माध्यमातून पिण्यासाठी गरम पाण्याची सुविधा उपलब्ध करून कोविड रूग्णांची केलेल्या सेवेचे कार्य हे दखल पात्र,आदर्शवत आहे.असे गौरवोद्गार कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मा.प्रविण यादव यांनी काढले.
ते पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने पेठवडगाव नगरपालिका संचलित कोविड उपचार केंद्रास पिण्याच्या गरम पाण्याच्या फिल्टर प्रदान कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांची प्रमुख उपस्थित होते.प्रविण यादव यांचे हस्ते नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांचेकडे फिल्टर सुफूर्त करणेत आला.यावेळी नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी पुरोगामी शिक्षक संघटनेने शैक्षणिक उपक्रम राबविणेत आघाडीवर असलेल्या पुरोगामीचे सामाजिक कार्य कौतुकास्पद असून संघटनेचे विविध क्षेत्रातील सेवाभावी कार्य पुढेही चालू ठेवावे.अशा शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी नगरसेवक मा.संदीप पाटील,नगरसेविका मा.प्रविता सालपे,विद्याताई पोळ, मुख्याधिकारी सुषमा शिंदे (कोल्हे), संतोष गुरव तसेच पुरोगामी संघटनेचे राज्य संघटक पी.आर पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष सुनील पोवार,करवीर तालुका सरचिटणीस शशिकांत पोवार, हातकणंगले तालुका सरचिटणीस घनश्याम तराळ, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गुरव, जिल्हा संघटक नंदकुमार आडके,गणेश कोळी, आदी उपस्थित होते. जिल्हा कोषाध्यक्ष अशोक खाडे यांनी आभार मानले.
Previous Articleबेळगाव बसस्थानकात महाराष्ट्राच्या लालपरीची एन्ट्री
Next Article सिमेंट व्यापारी ते केंद्रीयमंत्री









