बेंगळूर /प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना पहायला मिळत आहे. बुधवारी राज्यात ९,७२५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यासह, संक्रमित लोकांची एकूण संख्या ४,८४,९९० वर पोहोचली आहे. यापैकी १,०१,६२६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एकूण ३,७५,८०९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात बुधवारी रुग्णालयातून ६,५८३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण झालेल्या ७,५५५ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यापैकी १९ रुग्णांचा मृत्यू कोरोना व्यतिरिक्त कारणामुळे झाला आहे. राज्यात आयसीयूमध्ये एकूण ८१८ रूग्ण दाखल आहेत. राज्यात मृत्यूचे प्रमाण १.५५ टक्के होते आणि रुग्ण बरे होण्याचा दर ७७.४८ टक्के होता.
गेल्या२४ तासांत ३४,३३६ जलद प्रतिजैविक आणि ३६,६४५ आरटी-पीसीआर चाचण्यांसह एकूण ७०९८१ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत एकूण ३९,८६,२८३ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.









