बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ सुरूच आहे. गुरुवारी राज्यात ८,८६५ नवीन रुग्ण आढळले तर १०४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ७,१२२ रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून डिसचार्ज देण्यात आला आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३,७०,२०६ वर पोहचली आहे. यापैकी ९६,०९८ रुग्ण उपचार घेत आहेत आणि कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत ६,०५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण २,६८,०३५ रूग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तसेच ७३५ रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत.
गेल्या २४ तासांत ३२,४०३ जलद प्रतिजैविक आणि ३८,७२१ आरटी-पीसीआर चाचणीसह एकूण ७१,१२४ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत एकूण ३१,२३,९१८ लोकांची तपासणी केली गेली आहे. राज्यात मृत्यूचे प्रमाण १.६३ टक्के होते तर रुग्ण बरे होण्याचा दर ७२.४० टक्के होता.









