ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांंची संख्या वाढत आहे. मात्र, एक दिलासा देणारी बाब समोर आली आहे. मागील 24 तासात 38,687 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 29,192 नवे रुग्ण आढळून आले. यासोबतच 288 जणांचा मृत्यू झाला आहे. सद्य स्थितीत 3 लाख 24 हजार 944 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाचे एसीएस अमित मोहन प्रसाद यांनी सांगितले की, आतापर्यंत 8 लाख 96 हजार 477 जण कोरोनामुक्त झाले आहेत. काल दिवसभरात 2,29, 440 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील 29,192 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. प्रदेशात आतापर्यंत 13 हजार 450 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पुढे ते म्हणाले, प्रदेशात आता 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. प्रदेशात आतापर्यंत 1 कोटी 3 लाख 57 हजार 498 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 23,76,640 रूग्णांना लसीचा दुसरा डोस दिला आहे.









