ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. या संकटाला रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉक डाऊन जारी केले आहे. मात्र अशातच आता जगातील आरोग्य संघटनेने ( WHO) कोणतीही चूक करू नका, कोरोना व्हायरस आपल्या बरोबर बराच काळ राहणार आहे असा इशारा दिला आहे.
याबाबत बोलताना WHO चे प्रमुख टेड्रोस म्हणाले की, अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरस आता सुरू होत आहे, ज्या ठिकाणी या संकटाची सुरुवात झाली म्हणजेच चीन मध्ये देखील या व्हायरस चा संसर्ग पुन्हा वाढताना दिसत आहे. तसचं आफ्रिका, अमेरिकेत देखील रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कोणतीही चूक करू नका हा व्हायरस आपल्या बरोबर दीर्घ काळ राहणार आहे.
दरम्यान, जगभरात कोरोनामुळे 1.84 लाखांपेक्षा अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. 26 लाख पेक्षा अधिक लोकांना याची बाधा झाली आहे.









