ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनावर काही अंशी प्रभावी ठरलेल्या ‘कॉकटेल ड्रग’ (मोनोक्लोनल अँटिबॉडी) या औषधाचा दिल्लीमध्ये वापर सुरू करण्यात आला आहे. कॉकटेल ड्रग हे एक इम्युनिटी बुस्टर असून, ते बाधित व्यक्तीला सुरुवातीच्या 48 ते 72 तासांमध्ये दिले जाते.
‘रोशे’ या स्वित्झर्लंड येथील कंपनीने ‘सिप्ला’ या भारतीय फार्मा कंपनीच्या माध्यमातून हे औषध भारतात उपलब्ध केले आहे. झायडस कंपनीनेही या औषधाच्या मानवी चाचण्यांसाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. कॉकटेल ड्रग हे काही औषधांचे मिश्रण आहे. कासिरिविमाब व इम्डेव्हीमाब या औषधांचे यात 600 मिली मिश्रण आहे. त्याने कोरोनाविरुद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती वाढते. तसेच कोरोना विषाणूला मानवी पेशींमध्ये शिरकाव करण्यापासून ते रोखते.
हे औषध कोरोना रुग्णावर 70 टक्के परिणामकारक असून, या औषधामुळे रुग्णाला हॉस्पिटलाईज व्हावे लागत नाही, असा दावा रोशे कंपनीकडून करण्यात आला आहे.