ऑनलाईन टीम / जिनिव्हा :
कोरोनावरील उपचारासाठी ‘रेमडेसिवीर’ औषध प्रभावी ठरत असल्याचा कोणताही पुरावा नाही. त्यामुळे रुग्णांच्या उपचारासाठी या औषधाची शिफारस करता येणार नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.
‘रेमडेसिवीर’ औषध कोरोना रुग्णाच्या बचावासाठी आणि त्याचे ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी वापरण्यात येत होते. मात्र, WHO ने मागील महिन्यात केलेल्या सॉलिडॅरिटी चाचण्यांमध्ये या औषधाचा काहीही परिणाम होत नसल्याचे आढळून आले आहे. हे औषध कोरोनावर प्रभावी असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. त्यामुळे यापुढे रुग्णालयांना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर औषधाची शिफारस करता येणार नाही.
दरम्यान, WHO च्या सॉलिडॅरिटी चाचण्यांवर गिलीड कंपनीने संशय व्यक्त केला आहे. अनेक देशांमधील मान्यताप्राप्त संस्थांनी घालून दिलेल्या नियमांच्या आधारावरच रेमेडिसिव्हीरची निवड झाली असल्याचे गिलीडने म्हटले आहे.









