ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
डीआरडीओच्या (INMAS) आणि हैद्राबादच्या डॉ. रेड्डी लॅबने बनवलेल्या 2-deoxy-D-glucose (2-DG) या कोरोनावरील औषधाच्या आपत्कालीन वापराला DGCI ने परवानगी दिली आहे.
2-DG हे औषध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या तसेच जे कृत्रिम ऑक्सिजनवर अवलंबून आहेत, त्यांना हे औषध घेतल्यानंतर ऑक्सिजनची गरज कमी होईल. त्यांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह येण्याचे प्रमाण वाढते.
2-DG या औषधावर डीआरडीओ आणि डॉ. रेड्डी लॅबने एप्रिल 2020 मध्ये काम करायला सुरुवात केली होती. या औषधाच्या फेज-2 मधील क्लिनिकल ट्रायलला मे 2020 मध्ये परवानगी दिली होती. त्यानंतर मे-ऑक्टोबर 2020 मध्ये डीआरडीओ आणि डॉ. रेड्डी यांनी मिळून फेज-2 च्या ट्रायलला सुरुवात केली होती. या औषधाच्या क्लिनिकल ट्रायल्सदरम्यान हे औषध कोरोनावर प्रभावीपणे काम करत असल्याचे सिद्ध झाले.









