हुबळी/प्रतिनिधी
हुबळी- धारवाड जिल्हा प्रभारी मंत्री जगदीश शेट्टर यांनी सोमवारी कोविशील्ड लसीचा डोस घेतला. दरम्यान देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला १ मार्च पासून झाली आहे. देशासह राज्यातील बऱ्याच नेत्यांनी सोमवारी लस घेतली.
दरम्यान राज्याचे उद्योग आणि जिल्हा प्रभारी मंत्री जगदीश शेट्टर यांनी इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकात कोरोनाचे प्रणाम कमी-जास्त होत आहे. दररोज उघडकीस येणार्या कोरोना प्रकरणांची संख्या घटली आहे. ही संख्या शून्यावर आणण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे, असे मंत्री शेट्टर म्हणाले.
सोमवारी मंत्री शेट्टर यांनी ६० वर्षांच्या नागरिकांना लस देण्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील पीडितांना सोमवारी शहरातील किम्स रुग्णालयात कोविशील्ड लस देण्याचा कार्यक्रम पार पडला.