बळींची संख्या दिवसेंदिवस वाढतीच : एकूण बळींची संख्या 111 : सर्व आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांची वाढ
प्रतिनिधी / पणजी
राज्यात कोरोनाचे बळी मोठय़ा संख्येने वाढत असून ते थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. काल सोमवारी कोरोनाचे सात रुग्ण दगावल्याने बळींचा एकूण आकडा 111 झाला आहे. काल 355 नवे कोरोनाबाधित सापडले तर 283 जण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 11994 झाली असून त्यातील 8058 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 3825 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कोरोना बळींची व रुग्णांची संख्या वाढत असल्याने लोकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
कोरोनामुळे काल सोमवारी मृत्यू झालेल्यांमध्ये 4 महिला व 3 पुरुष रुग्णांचा समावेश आहे. कुडचडेतील 37 वर्षीय महिला, शिवोलीतील 83 वर्षीय पुरुष, चिंबल येथील 35 वर्षीय पुरुष, फोंडा येथील 91 वर्षीय पुरुष, बायणा वास्कोतील 76 वर्षीय महिला, कुंकळ्ळीतील 64 वर्षीय महिला व हळदोणातील 56 वर्षीय महिला या 7 जणांना विविध हॉस्पिटलमध्ये मरण आले. काहीजण आधीच कोरोना पॉझिटिव्ह होते तर काहीजणांची मृत्यूनंतरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह मिळाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.
गोमेकॉ आयसोलेशन वॉर्डात 93 जण
कोरोनाचे संशयित रुग्ण म्हणून 93 जणांना गोमेकॉ बांबोळी येथील हॉस्पिटलमधील आयसोलेशन वॉर्डात भरती करण्यात आले आहे. विविध हॉटेल्समध्ये 35 जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून 284 जणांचे कोरोना चाचणी अहवाल प्रलंबित आहेत. 209 जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. विविध मार्गाने गोव्यात आलेल्या दोन प्रवाशांना कोरोनाची लागण झाली आहे. 12 देशी प्रवाशांना होम क्वॉरंटाईन तर 16 जणांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात आल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.
सर्व आरोग्य केद्रांतील कोरोना रुग्णांची नोंदणी पाहिली तर त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कमी होण्याची चिन्हे नाहीत. चतुर्थीच्या खरेदी-विक्रिसाठी लोकांची गर्दी वाढत असल्याने रुग्ण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कुंकळीच्या माजी उपनराध्यक्षांचा कोविडमुळे मृत्यू
प्रतिनिधी / मडगाव
कुंकळ्ळी नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्षा फिलोमेना उर्फ मीना फर्नांडिस यांना मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू आला. सोमवारी सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मडगावच्या एका नामांकीत विद्यालयात त्या शिक्षिका होत्या. काही वर्षापूर्वी निवृत्त झाल्या होत्या. त्याच्यामागे पती व मुलगी असा परिवार आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांना मडगावच्या कोविड इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र, या रोगाशी लढत असताना त्यांना मृत्यू आला. माजी मंत्री ज्योकीम आलेमाव यांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे.

फिलोमेना उर्फ मीना फर्नाडिस
आरोग्य केंद्रनिहाय रुग्णांची संख्या
डिचोली 26
सांखळी 121
पेडणे 158
वाळपई 146
म्हापसा 129
पणजी 189
हळदोणे 34
बेतकी 63
कांदोळी 93
कासारवर्णे 29
कोलवाळ 91
खोर्ली 102
चिंबल 234
शिवोली 30
पर्वरी 166
मये 102
कुडचडे 87
काणकोण 37
मडगाव 480
वास्को 353
बाळ्ळी 50
कासावली 104
चिंचिणी 20
कुठ्ठाळी 153
कुडतरी 97
लोटली 63
मडकई 66
केपे 79
सांगे 66
शिरोडा 68
धारबांदोडा 126
फोंडा 199
नावेली 62
राज्यातील आतापर्यंतचे एकूण रुग्ण 11994
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण 8058
17 ऑगस्ट रोजीचे नवे रुग्ण 355
17 ऑगस्ट रोजी बरे झालेले रुग्ण 283
सध्याचे सक्रिय रुग्ण 3825
17 ऑगस्ट रोजीचे मृत्यू 7
आतापर्यंतचे एकूण मृत्यू 111









