ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या जवानांनाही आता शहीदांचा दर्जा मिळणार आहे. तसेच ‘भारत के वीर’ फंडातून त्यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदतही दिली जाणार आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक कोरोना योद्धे मैदानात आहे. पोलिसांबरोबर पॅरामिलिट्री सैनिकही आता ड्यूटीवर तैनात आहेत. त्यामुळे या सैनिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांना शहिदाचा दर्जा दिला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच सुरक्षा दलाने यासंदर्भातील अहवाल सरकारला पाठवला होता. त्याला केंद्रीय गृहमंत्रालयाने मंजूरी दिली आहे.
‘भारत के वीर’ या पोर्टलवर कोरोना शहिदांची माहिती दिली जाते. सर्वसामान्य लोकही या जवानांच्या कुटुंबियांना मदत करू शकतात. त्यासाठी आवश्यक ती बँक अकाउंटची माहिती उपलब्ध करून दिली जाते.









