ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाने राज्यातील पोलीस दलतील दुसरा बळी घेतला आहे. मृत्यू झालेले हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पपेंदुरकर आणि संदीप सुर्वे यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये आणि त्यांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत केली.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, कोरोनाशी झुंजताना दोन हॅड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदुरकर व संदीप सुर्वे यांचे दुर्दैवी मृत्यू फारच दुःखदायक आहेत. राज्य सरकार त्यांच्या परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असे आश्वासन ही दिले. तसेच प्रत्येक परिवाराला 50 लाखांची मदत आणि सरकारी नोकरी दिली जाईल.
आतापर्यंत राज्यातील 96 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात 15 पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि सरकारच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची एकूण संख्या आठ हजारच्या वर पोहचली आहे. त्यामुळे या संकटाला रोखण्यासाठी तीन मे नंतर ही लाॅक डाऊन वाढवण्याची शक्यता आहे.









