वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
मार्च महिन्यात सरकारी तेल कंपन्यांची पेट्रोल विक्री 17 टक्के आणि डिझेल विक्री 26 टक्क्मयांनी घसरली आहे. न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या सुत्रानी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा प्रभाव आणि देशातील लॉकडाउनमुळे पेट्रोल व डिझेलच्या मागणीत मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. देशातील किरकोळ इंधन आउटलेटसमध्ये तीन सरकारी कंपन्या आहेत. त्यात इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम यांचे जवळपास 90 टक्के समभाग आहेत.
मार्च महिन्यात 19.4 लाख टन पेट्रोल आणि 49.8 लाख टन इतकय़ा डिझेलची विक्री झाली आहे. विमान उड्डाणे बंद असल्याने आणि त्यात लॉकडाउनचा काळ सुरु असल्याने हवाई इंधन विक्री 33 टक्क्मयांनी घटून 45 लाख टनावर पोहोचली आहे. एका बाजूला पेट्रोल व डिझेलच्या किमती घसरल्यात तर दुसरीकडे मात्र एलपीजीची विक्री मार्चमध्ये 1.7 टक्क्मयांनी वधारुन 23 लाख टनावर पोहोचली आहे.
विदेशी उड्डाणे रद्द
कोरोनाचा देशातील वाढता संसर्गामुळे केंद्र सरकारने 25 मार्च ते 14 एप्रिल या कालावधीत लॉकडाउन लागू केला आहे. यामुळे देशामधून विदेशात होणारी सर्व विमान उड्डणे रद्द करण्यात आली आहे. याचाच काहीसा परिणाम म्हणून इंधन विक्रीत मोठय़ा प्रमाणात मार्चमध्ये घट नोंदवण्यात आली आहे.









