नवे रुग्ण 433, तर 394 कोरोनामुक्त
प्रतिनिधी / पणजी
राज्यात कोरोनामुळे बुधवारी 9 जणांनी प्राण गमावले असून त्यामुळे आता एकूण बळी 477 झाले आहेत. 433 नवे कोरोना रुग्ण सापडले आणि 394 जणांना कोरोनातून मुक्ती मिळाली आहे. सध्या 4749 एवढे सक्रिय रुग्ण असून 71 जणांना संशयित रुग्ण म्हणून गोमेकॉत भरती करण्यात आले आहे.
एकूण 322 जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या 36670 वर पोहोचली असून त्यातील 31444 जण बरे झाल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.
बुधवारी गोमेकॉत 5 जणांचा मृत्यू झाला तर ईएसआय मडगाव हॉस्पिटलमध्ये 3 जणांनी प्राण सोडला. एकाचे उत्तर गोव्यातील खासगी इस्पितळात निधन झाले. हॉस्पिटलात दाखल केल्यानंतर 3 जणांचा 10 तासांच्या आत मृत्यू ओढवला.
पणजीत 23 नवे रुग्ण
पणजी शहरात बुधवारी 23 नवीन कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. करंजाळे, बोक द व्हाक, सांतईनेज, मिरामार, भाटले या भागात ते रुग्ण मिळाल्याची नोंद झाली आहे. त्यात 8 व 16 वर्षीय मुलांचा तसेच तरुण वयोगटातील महिला, पुरुषांचा सामावेश आहे.
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. डिचोली – 139, सांखळी 259, पेडणे 149, वाळपई 162, म्हापसा 227, पणजी 191, हळदोणा 114, बेतकी 92, कांदोळी 199, कासारवर्णे 69, कोलवाळ 110, खोर्ली 190, चिंबल 225, शिवोली 203, पर्वरी 262, मये 53, कुडचडे 129, काणकोण 161, मडगाव 331, वास्को 246, बाळ्ळी 74, कांसावली 92, चिंचिणी 44, कुठ्ठाळी 156, कुडतरी 79, लोटली 63, मडकई 81, केपे 91, सांगे 102, शिरोडा 37, धारबांदोडा 65, फेंडा 271, नावेली 83,
7 ऑक्टोबरपर्यंतचे कोरोना रुग्ण : 36670
7 ऑक्टोबरपर्यंत बरे झालेले रुग्ण : 31444
7 ऑक्टोबरचे सक्रीय रुग्ण : 4749
7 ऑक्टोबरचे नवीन रुग्ण : 432
7 ऑक्टोबरला बरे झालेले रुग्ण : 394
7 ऑक्टोबरला बळी गेलेले रुग्ण : 9
आतापर्यंतचे एकूण बळी : 477









