वृत्तसंस्था/ पॅरीस
या वर्षी येथे होणारी पॅरीस मॅरेथॉन कोरोना महामारी संकटामुळे रद्द करण्याचा निर्णय स्पर्धां आयोजकांनी बुधवारी जाहीर केला आहे. सदर मॅरेथॉन फ्रान्सच्या राजधानीत घेतली जाणार होती.
सुरूवातीला सदर पॅरीस मॅरेथॉन 5 एप्रिलला घेतली जाणार होती पण ती 15 नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली. जगातील विविध देशांमध्ये होणाऱया अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये अव्वल दर्जाचे धावपटू सहभागी होत असल्याने चालू वर्षी होणारी पॅरीस मॅरेथॉन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. 2020 सालातील न्यूयॉर्क, बोस्टन, शिकागो आणि बर्लीन मॅरेथॉन कोरोना महामारीमुळे याआधी रद्द करण्यात आल्या आहेत.









