प्रतिनिधी / कुरुंदवाड
जगभरात धुमाकुळ घालणाऱ्या कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण भारतभर लॉकडाउन केल्या मुळे नदीकाठावर वसणाऱ्या क्षेत्रातील नौका व्यवसायिकांना फटका बसला असुन उपासमारीची वेळ येऊ लागली आहे. महाराष्ट्रात अनेक क्षेत्रे ही नदीकाठावर वसली असून पंढरपूर ,नाशिक, औंदुबर नृसिंहवाडी, वाई अश्या प्रमुख क्षेत्रांचा या मध्ये समावेश होतो या क्षेत्रामध्ये अनेक नौका व्यवसायिक आपला नौकानयनाचा व्यवसाय आपल्या उपजीवीकेसाठी करतात. काही नदीवर पुल नसल्याने वहातुकीसाठी नावेचाच उपयोग करत असतात पुर्वीच्या काळी धान्य कपडे तसेच पैसे घेऊन हे व्यवसायिक सेवा करत होते.
बहुतांशी क्षेत्रांमध्ये शासनाकडे लिलाव बोलुन नौका चालवण्याचा ठेका घेतला जातो, याचे पैसे ही आधी भरुन घेतले जातात. तर काही जणांच्या स्वता: च्या नौका आहेत. अनेक भक्त दर्शना बरोबरच नौका विहाराचा आनंद सहकुटुंब लुटतात, पण ऐन सुगीच्या दिवसातच कोरोनाचे संकट आल्याने मंदिरे भाविकांच्या दर्शनाकरता बंद केली आहेत. तसेच लॉकडाउन मुळे भावीक येणे बंद झाल्याने ,या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ऑगष्ट २०१९ मध्ये आलेल्या महापूरामध्ये या व्यवसायिकांनी जिवाची पर्वा न करता शिरोळ तालुका सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक माणसांचे प्राण वाचवले होते.पण सध्या हेच नौका व्यवसायिक अर्थीक संकटाच्या छायेत आहे.