टोकियो
जपानचा पुरूष टेनिसपटू केई निशीकोरी दुसऱयांदा घेण्यात आलेल्या कोरोना चांचणीत पॉझिटिव्ह ठरल्याने त्याला अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेला मुकावे लागत आहे. 30 वर्षीय निशीकोरी याला गेल्या आठवडय़ात कोरोनामुळे एटीपी टूरवरील वेस्टर्न-सदर्न टेनिस स्पर्धेला मुकावे लागले होते.
गेल्या आठवडय़ात घेण्यात आलेल्या पहिल्या कोरोना चांचणीत निशीकोरीला बाधा झाली होती. कोरोनाच्या लागण समस्येमुळे तो अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत सहभागी होवू शकणार नाही.









