प्रतिनिधी
फोंडा
कोरोनामूळे उन्हाळयाच्या हंगामात नाटक बंद असल्याने नाटयकलाकारांचे कमावण्याचे सर्वच दिवस संचारबंदीमुळे वाया गेले आहे. त्यामुळे नाटय़क्षेत्रातील पुर्णवेळ रंगमंच कामगाराच नाही तर कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि निर्मातेही अडचणीत आलेले आहेत. सर्व ऑन स्टेज व ऑफ स्टेज कलाकारांना उदारनिर्वाहाची चिंता सतावू लागली आहे. अशा आणीबणीच्या परिस्थितीत कलाकारांच्या उदारनिर्वाहासाठी सरकारने आर्थिक मदत किंवा सेवेत सामवून घेत पुढाकार घ्यावा अशी कळकळीची विनंती नाटय़कलाकारांच्यावतीने कलाचेतना वळवईचे संस्थापक तथा उत्कृष्ट अभिनेते राजदीप नाईक यांनी काल गुरूवारी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार पषिपदेतून केली आहे.
यावेळी कलाचेतनाचे प्रतिनिधी मोहनदास नाईक, खामिणी नाटय़माचीचे आकाश पालकर उपस्थित होते. कलाकारांना सद्यपरिस्थितीत घरी बसून भूक सतावत आहे तर बाहेर आजाराची लागण होण्य़ाची भीती अशी द्विधा लॉकडाऊन परिस्थिती निर्माण झालेली आहे.
पुर्णवेळ कलाकारांना आर्थिक मदत किंवा सेवेत सामावून घ्या
गोव्यातील पुर्णवेळ रंगमंच कामगार आणि पडद्यामागील कलाकारांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी सरकारने कलाकारांच्या कुवतीनुसार आकाशवाणी, माहिती व प्रसिद्धि खाते, दुरदर्शन यामध्ये रोजगारांच्या संधी किंवा आर्थिक पुरावावी अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंदीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांना सादर करणार असल्याची माहिती दिली.
पुर्णवेळ कलाकारांनी जगायचे कसे? कुणीच वाली नाही-राजदीप
व्यवसायिक नाटय़संस्था नाटय़प्रयोगांवरचे उदारनिर्वाह करीत होते. त्यामुळे सर्वांना उद्याची चिंता सतावू लागली आहे. हातावर पोट असलेल्या हा वर्ग खऱया अर्थाने उपासमारीने जगत आहे. काही पार्टटाईम कलाकारांना यातून वगळण्यात आले असून जे कलाकार पुर्णवेळ नाटक करतात, त्याच्यापुढे उपजिवीकेचा प्रश्न आहे. संचारबंदीनंतर नाटक व्यवसाय रूळावर येईल शाश्वती नसल्यामुळे हे चित्र सावरल्यानंतरही कलाक्षेत्र सावरेल याचा अंदाज बांधता येत नाही. पुन्हा नाटकांची घडी बसवताना नाटय़संस्थांना विचारात घेऊन शासनाने मिळून यावर मार्ग काढणे आवश्यक असल्याचे मत राजदीप नाईक यांनी व्यक्त केले. चतुर्थीपासून सुरू होणाऱया व्यवसायिक नाटकप्रयोगासाठी मार्च, एप्रिल, मे हा कमाईचा काळ असतो लॉकडाऊनच्या सद्यपरिस्थितीत राज्यभरातील सुमारे 30-35 नाटय़संस्था कामाविना बेकार हलाखीचे जीवन व्यथीत करत आहे. या व्यवसायाला कुणीच वाली उरला नसून कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे जे स्वत: एक कलाकार असूनसुद्धा त्यांनी दखल घेतलेली नाही.
कोकणीवादीनीही दखल न घेतल्याची खंत
कोकणी चळवळीत पुढाकार घेणाऱया श्रीधर कामत बांबोळकर व अन्य एका पुढाऱयांनी सोडल्यास कुणीही दखल घेतली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. कोकणी नाटय़माध्यमातून ‘कोकणीला’ गावागावात पोचवणारे कलाकार कोरोनाकाळात कसे उपासमारीने जीवन व्यथित करत आहे याची दखल घेतली नसल्याची खंतही राजदीप नाईक यांनी व्यक्त केली.
आठशे ते हजार नाटयकलाकारांच्या उदारनिर्वाहाचा प्रश्न
आकाश पालकर हे खमिणी कलामाची या संस्थेत मागील 9 वर्षापासून कार्यरत असून स्वत: कला अकादमीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पदवीधर आहे. फक्त या नाटय़संस्थेद्वारे होत असलेल्या नाटकातून स्वत:सह आपल्या 20 कलाकाराचा उदारनिर्वाह चालवित आहे. त्यानाही चिंता सतावू लागल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रयोग फार होत नसतात. त्यामुळे निर्मात्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक नुकसान नाटकाचे होणार आहे. केरोनाच्या सावट पुर्णपणे बरे झाल्याशिवाय हा व्यवसाय उभा राहणार नाही त्यामुळे सरकारने कलाकारांचे दखल घेत पुढाकार घ्यावा असे आवाहन पत्रकार परिषदेतून केले आहे. या निवेदनात हौशी, उत्सव तियात्र, ओर्कोस्ट्रा व संगीत कलाकारांचा समावेश नाही. फक्त व्यवसायिक रंगमंचावरील सुमारे आठशे ते हजार कलाकरांतर्फे हे निवेदन सरकारला देण्यात येणार आहे. राज्यभरातील सर्व नाटय़संस्थांनी या निवेदनात सहय़ाची मोहीमेतून सहभागी व्हावे असे राजदीप नाईक यांनी सर्व संस्थांना आवाहन केले आहे.









