कळेसह पन्हाळा तालुका, जिल्हा हादरला
कळे / वार्ताहर
कोरोनामुळे एकाच कुटूंबातील तिघांचा आज आज शनिवार दि. १९ रोजी मृत्यू झाला. कळे (ता.पन्हाळा) येथील एकाच सदन कुटुंबातील आईसह दोन मुलांचा या मृतात समावेश असून काळाने देसाई कुटूंबावर घाला घातला आहे आजच्या या घटनेने कळेसह, पन्हाळा तालुका, जिल्हा हादरला आसून याच कुटूंबातील वडील व अन्य एक मुलगा यांचे वर कोरोनाचे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
कळेतील देसाई कुटूंबात कोरोना सदृष्य त्रासाला सुरवात झालेवर आई वडील व पोलीस दलात असलेला लहाण भाऊ यानी खाजगी रुग्णालयात उपचारास दाखल झाले वर त्यांची कोरोना टेस्ट पॉझीटीव्ह आली होती त्यांचेवर उपचार सुरू असताना अन्य दोघांना त्रास जाणवू लागला त्यांनाही खाजगी रुग्णालयात उपचारास चार दिवसात दाखल केले होते एकाच देसाई कुटूंबातील आई, वडील, तीन संख्खे भाऊ असे पाच जनावर कोरोनाचे उपचार सुरू होते.
आज शनिवारी पहाटेच देसाई कुंटूबातील सौ.मालुबाई पांडुरंग देसाई वय ६१ यांचा मृत्यू झाला तर या पाठोपाठ त्याची मुले दिपक वय ४२ व सागर वय ३८ यांचा काही अंतरातील वेळाने मृत्यू झाला कोरोनामुळे एकाच कुटूंबावर काळाच्या पडलेल्या घाल्याने कळेसह परिसर हादरला तालुक्यात दहा दिवसाचा जनता कर्फ्यू असून देखील पाचव्या दिवशी कळे बाजारपेठ चालू केलेल्या व्यापाऱ्यांनी तातडीने सर्व व्यवहार बंद केले कळे परिसरावर कोरोनाची आता या घटनेने धास्तीच निर्माण झाली आहे कळेतील कोरोना रुग्णांची संख्या ८० वर पोहचली आहे तर कळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेतील गोवातून कोरोना बाधीतांची संख्या १८६ झाली आहे.
कळे येथे अपार कष्ट करून वाळू,सळी, सिमेंट,कौले उद्योगधंद्यात जम बसवत परिसरात उद्योगपती म्हणून नावारूपाला सदन असे देसाई कुटुंबातील एकाच दिवशी आईसह दोन विवाहित मुलांचा कोरोनाने झालेल्या मृत्यू सर्वाच्याच मनाला चटका लावणारा ठरला आहे यामुळे कळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
देसाई कुटुंबात वडील पाहुरंग, लहाण भाऊ जलराज यांचे वर उपचार सुरू आहे. निधन झालेल्या दोन सख्या भावांना दोन दोन लहाण मुले आहेत तसे तीघां भावडांना दोन दोन मुले आहेत. यातील निधन झालेले दोन भाऊ व्यवसाय साभाळत होते तिसरा भाऊ पोलीस खात्यात कर्तव्य बजावत असताना कोरोना पॉझिटिव्ह आला होता त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कामुळेच देसाई कुटूंबात कोरोनाचा शिरकाव झाला परिसरात मोठ्या व्यवसायामुळे देसाई कुटूंबाचा मित्रपरिवार व नातेवाईक यांचा गोतावळा मोठा आहे. त्याचा परिसरात चांगला दबदबा देखील आहे सर्वाशी आदराने वागणाऱ्या या कुटूंबा बद्दल जनतेत देखील चांगला जिव्हाळा निर्माण केला होता.
आपोआप शटर डाऊन झाले …..
कळे परिसरात व्यवसाय करणारे दोघे सख्खे भाऊ आज अचानक गेले ने ह्याची धास्ती कळे परिसरातील लहान मोठया व्यावसाईकांनी घेतली दहा दिवसाचा जनता कर्फ्यू काळात फक्त पाचच दिवस कळे बंद ठेवून सहभाग घेतला होता. जनता कर्फ्यू जुगारून व्यवसाईकांनी व्यवसाय चालू केला होता. आज देसाई कुटूंबावर आलेल्या काळाच्या घाल्याने कळे परिसरात कोरोनाचा विळखा घट होत चालला आहे याची जाणीव करून दिली त्यामुळे देसाई बंधूच्या निधनाचे वृत्त समजताच व्यापाऱ्यानी आपोआपच शटर डाऊन केले.
Previous Articleचेन स्नॅचिंग प्रकरणी दोघा जणांना अटक
Next Article नदीकाठावरील अतिक्रमणाचे सर्व्हेक्षण









