शुक्रवारी 63 नवे रुग्ण, 8 जण झाले बरे
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या 24 तासांत कोरोनामुळे आणखी तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. बेळगाव, गोकाक तालुक्मयातील दोन वृद्ध व हुक्केरी तालुक्मयातील एका युवकाचा यामध्ये समावेश असून शुक्रवारी रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. 63 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर आठ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
एका बेळगाव तालुक्मयातील 31 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बंबरगा, बेळगुंदी, कंग्राळी खुर्द, गणेशपूर, काकती, शिवाजीनगर, वैभवनगर, सहय़ाद्रीनगर, टिळकवाडी, कॅम्प, बिम्स कॉलेज, खासबाग, शिवबसवनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पाचहून अधिक लहान मुलांचाही समावेश आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांचा आकडा 79 हजार 597 वर पोहोचला आहे. यापैकी 78 हजार 383 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 307 सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. मृतांचा सरकारी आकडा 907 वर पोहोचला आहे.
आतापर्यंत जिल्हय़ात 13 लाख 17 हजार 111 जणांची स्वॅब तपासणी केली आहे. त्यापैकी 12 लाख 29 हजार 215 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अद्याप 3 हजार 536 जणांचा स्वॅब तपासणी अहवाल यायचा आहे. 56 हजार 730 हून अधिक जण 14 दिवसांच्या होमकेअरमध्ये आहेत.









