मुंबई \ ऑनलाईन टीम
कोरोनामुळे अनाथ झालेले एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये यासाठी दोन्ही सरकारच्या यंत्रणांनी परस्पर सामंजस्य व गांभिर्याने काम करण्याची आवश्यकता असल्याचे सांगतानाच याबाबत सकारात्मक विचार करावा , अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत केली आहे. एकामागोमाग एक अशी तीन ट्वीट करत त्यांनी विनंती केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, कोरोनाच्या विषाणूंमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.अनेक मुलांच्या डोक्यावरचे माता-पित्यांचे छत्र नष्ट झाले आहे.घरातील कमावत्या पालकाचे कोरोनामुळे निधन झाल्यामुळे अनेक मुलांच्या भविष्याचा प्रश्न देखील प्रकर्षाने पुढे आला आहे.त्यांचे शिक्षण,आरोग्य इत्यादीची काळजी घेणे आवश्यक आहे.
कोरोनाच्या विषाणूंमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक मुलांच्या डोक्यावरचे माता-पित्यांचे छत्र नष्ट झाले आहे. घरातील कमावत्या पालकांचे कोरोनामुळे निधन झाल्यामुळे अनेक मुलांच्या भविष्याचा प्रश्न देखील प्रकर्षाने पुढे आला आहे. त्यांचे शिक्षण, आरोग्य इत्यादीची काळजी घेणे आवश्यक आहे असेही सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची आवश्यकता असून केंद्रसरकारने व राज्यसरकारने परस्पर सामंजस्याने व गांभीर्याने काम करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. मुलं देशाचे भविष्य असतात. त्यामुळे त्यांच्या भविष्याला आकार देण्याचे काम आपल्याला करावेच लागणार आहे. ती आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारीदेखील आहे याची आठवणही सुप्रिया सुळे यांनी करुन दिली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक मुलांनी मायेचे छत्र हरवले आहे. तर काहींनी जवळचा व्यक्ती, नातेवाईक गमावले आहेत. या सगळ्यांना सध्या आधाराची गरज आहे. यासाठी सुप्रिया सुळे यांनी ज्या कोरोनामध्ये ज्या मुलांनी मायेचे छत्र हरवले आहे,त्यांची जबाबदारी घेण्य़ासाठी , त्यांच्या भिवष्याचा विचार करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारला विनंती केली आहे.








