सोमवारची शुभवार्ता, मृत्यूदर, उपचाराधीन रूग्णांच्या संख्येत घट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना उद्रेकाच्या संदर्भात सोमवारचा दिवस विशेष महत्वाचा ठरला आहे. सोमवारी 57 हजार 937 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या उलट त्यापेक्षा कमी, अर्थात 55 हजार 79 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे अशा प्रकारे व्याधीमुक्त झालेल्यग्ना रूग्णांची संख्या नव्या रूग्णसंख्येपेक्षा जास्त झाली असून ही सकारात्मक घटना असल्याचे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले.
याशिवाय सोमवारी आतापर्यंतच्या सर्वाधिक चाचण्याही घेण्यात आल्या. त्यांची संख्या 8 लाख 99 हजार 864 इतकी होती. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या चाचण्यांची संख्या 3 कोटी 9 लाख 41 हजार 264 इतकी असल्याची माहिती देण्यात आली. मोठय़ा प्रमाणात चाचण्या घेऊनही रूग्णसंख्या त्या प्रमाणात वाढलेली नाही. उलट बऱया झालेल्या रूग्णांची संख्या नव्या रूग्णांपेक्षा जास्त झाल्याने एकंदर उपचाराधीन रूग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे.
केंद्र, राज्यांचे प्रयत्न
केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांच्या संयुक्त तसेच स्वतंत्र प्रयत्नाने, नियोजनबद्ध उपाययोजनांमुळे अद्यापही कोरोना स्थिती नियंत्रणात आहे. सामाजिक संक्रमण सुरू झाल्याचे विशेष दिसून आलेले नाही. 10 राज्यांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, ओरीसा आणि बिहार अशी ही राज्ये आहेत. तथापि, देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत इतर अनेक देशांपेक्षा आजही भारतात स्थिती बरी आहे. प्रति दहा लाख रूग्णसंख्येत भारत जगात 85 व्या स्थानावर आहे, अशीही माहिती विविध वृत्तसंस्थांकडून मिळत आहे.
संख्या सव्वादोनपट अधिक
सध्या उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या संख्येपेक्षा बरे व्याधीमुक्त झालेल्या रूग्णांची संख्या आता जवळपास सव्वादोन पट अधिक आहे. एकंदर 19 लाख 77 हजार 779 रूग्ण व्याधीमुक्त झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण 73.18 टक्क्यांवर पोहचले आहे. तर कोरोनामुळे होणाऱया मृत्यूचा दर 1.92 टक्के आहे. सोमवार दिवसअखेरपर्यंत उपचाराधीन रूग्णांची संख्या 6 लाख 73 हजार 166 इतकी होती.
प्रयत्न न सोडणे आवश्यक
ड स्थिती हाताबाहेर गेलेली नसली तरी प्रयत्न करत राहणे आवश्यक
ड लस किंवा औषध यांची वाट पाहण्यापेक्षा दक्षता घेणे जास्त आवश्यक
ड सामाजिक अंतर, हातांची वारंवार स्वच्छता, सॅनिटायझर आवश्यक ड केंद्र, राज्य सरकारांच्या प्रयत्नांवर अनेक तज्ञांकडून समाधान व्यक्त









