बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी राज्य सरकारकडून कोरोना नियंत्रणासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून काही कठोर पावले उचलणे अपरिहार्य आहे, असे ते म्हणाले.
मंत्री सुधाकर यांनी तज्ञांच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या सल्ल्यानुसार मार्गदर्शक सूचना जरी केल्या आहेत. २० एप्रिलपर्यंत परिस्थिती चांगली राहिल्यास, आढावा घेतल्यानंतर सर्व पुन्हा सुरू करण्यास अनुमती दिली जाईल.
आम्हालाआनंद होत नाही
सरकार कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. मी गेल्या एक महिन्यापासून माध्यमांद्वारे सर्वांना विनंती करीत आहे की कोरोनाची दुसरी लाट आली आहे, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. जर लोकांना हे समजले नाही आणि खबरदारीचा उपाय न केल्यास सरकारकडे दुसरा पर्याय उरला नाही आणि त्यांना गंभीर पावले उचलावी लागतील, असे ते म्हणाले.