देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना एक चांगली बातमी समोर आली आहे. दिल्लीच्या एम्समधील एका डॉक्टरच्या कोरोना पॉझिटिव्ह पत्नीने शुक्रवारी रात्री एका सुदृढ बाळाला जन्म दिला आहे. पती, पत्नी दोघांनाही कोरोनाची लागण झाली असली तरीही बाळ सुदृढ आहे. परंतु खबरदारीच्या स्वरुपात आई आणि बाळाला सध्या क्वारेंटाईन करण्यात आले आहे. दिल्लीत कोरोना पॉझिटिव्हकडून सुदृढ बाळाला जन्म देण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. फिजियोलॉजी विभागाचे रेसिडेंट डॉक्टर काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित आढळून आले होते. काही तासांची त्यांच्या गरोदर पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
प्रसूती सीजेरियन पद्धतीने झाल्याची माहिती एम्सचे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर डी.के. शर्मा यांनी दिली आहे. वैद्यकीय पथकाच्या प्रत्येक सदस्याने पसर्नल प्रोटेक्शन इक्विपमेंट परिधान केले होते. आईच्या दूधातून कोरोना फैलावत नसल्याने बाळाला स्तनपान करता येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.









