ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यातील राजगुरूनगर परिसरात राहणाऱ्या कोरोनाबाधित ज्येष्ठ नागरिकाने हाताची नस कापून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
दिनकर ज्ञानेश्वर जुन्नरकर (वय 60) असे आत्महत्या केलेल्या कोरोनाबाधिताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत जुन्नरकर हे शहरातील बाजारपेठ परिसरात राहत होते. काही दिवसांपूर्वी जुन्नरकर आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली होती. खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर दोघेही घरी आले. मात्र, दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत नव्हती.
या दाम्पत्याला घरी येऊन ट्रीटमेंट देण्यास कोणतेही डॉक्टर तयार नव्हते. शुक्रवारी (दि.7) दोघांचेही स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. आज (दि.8) त्यांचे रिपोर्ट येणार होते. मात्र, शारीरिक त्रास कमी होत नसल्याने नैराश्यातून जुन्नरकर यांनी हाताची नस कापून आपली जीवनयात्रा संपवली. याबाबतचा अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत.








