ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेडरोस अदनोम घेबियस यांनी स्वतःला क्वारंटाईन केले आहे. टेडरोस यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
टेडरोस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मागील काही दिवस माझ्या संपर्कात असलेल्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह झाला आहे. त्यामुळे मी खबरदारी म्हणून स्वतःला होम क्वारंटाईन केले आहे. सध्या मला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. मी पूर्णपणे बरा आहे. WHO च्या प्रोटोकॉलप्रमाणे मी घरातून काम करणार आहे.









